बेळगाव : हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे जैन मुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या झालेल्या क्रूर हत्येचा निषेधार्ह व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी मांजरी ता. चिक्कोडी येथील एकता सोशल फाउंडेशनच्या वतीने मांजरी बस स्थानकाजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री 108 कामकुमार नंदी महाराजांच्या भावप्रतिमेचे पुजा डॉ. विजय उपाध्ये व डॉ. रमेश खिचडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पौरोहित्य उपाध्ये यांनी नमोकार मंत्राचे पठण केले.
यावेळी डॉ. विजय उपाध्ये बोलताना म्हणाले, अखंड देशाला आहिंसाचे संदेश देणारे जैन धर्म हे पवित्र धर्म आहे. या धर्मातील मुनी महाराजांची हत्या म्हणजेच संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. याचा अखंड हिंदू जागृत संघटना तीव्र निषेध करीत आहे. साधू संतांच्या हत्या होत असलेली ही बाब गंभीर आहे. त्यासाठी सर्वच हिंदू संघटना व हिंदू नागरिकांनी आता तरी जागृत होणे गरजेचे आहे. मुनी महाराजांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी केली. यावेळी सिद्धार्थ गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी एकता सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष दिलीप पवार, सुरेश मांगलेकर, संजय नांद्रे, दीपक टोणपे, श्रीधर भोजकर, शशिकांत पाटोळे, अमर यादव, चंदुरचे माहाविर मंगसुळे, सुनिल खिचडे, सनी पाटील, चंद्रसेन कदम, फारुख तांबोळी, सचिन माने, पोपट भोजकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta