चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे विद्युत तारा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चिक्कोडी येथे हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना सिद्धराम नामक व्यक्तीला खांबावर चढवले असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा खांबावरच मृत्यू झाला. सिद्धराम गेल्या ६ महिन्यांपासून केईबीमध्ये कामाला जात असल्याचे समजते.
सदर घटनेस हेस्कॉमचे अधिकारी कारणीभूत असल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta