चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्न समारंभातील जेवण जेवल्यानंतर विषबाधा होऊन १०० हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली.
झाकीर पटेल यांच्या मुलीचे काल लग्न झाले. या पार्श्वभूमीवर हिरेकोडी गावाच्या शिवारात भव्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्यात सहभागी होऊन घरी परतलेल्या 100 हून अधिक लोकांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
52 गंभीर आजारी लोकांना चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरितांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोग्य अधिकार्यांनी हिरेकोडी शासकीय शाळेत शिबीर लावून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली.
डीवायएसपी गौडर यांनी रुग्णालयाला भेट देऊन ग्रामस्थांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच गावाला भेट देऊन पाहणी केली. लग्न समारंभात सहभागी झालेल्या झाकीर पटेल यांच्या नातेवाईकांचीही प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta