Sunday , July 26 2026
Breaking News

‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून शास्त्रीनगर व परिसरातील महिलांसाठी आरोग्यावर आज मार्गदर्शन

Spread the love

 

बेळगाव : शास्त्रीनगर भागातील नोकरदार महिला, बचत गटांच्या महिला, महिला मंडळातील सदस्य, योगासन ग्रूप, असंघटित कामगार महिला तसेच गृहिणी आपल्या दैनंदिन कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. या महिलांनी थोडासा वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच आपल्या सभोवतालच्या महिला निरोगी असाव्यात ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे समजून ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संघ, गुजराती नवरात्री उत्सव मंडळ, मजदूर नवनिर्माण संघ आणि शालिनी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुजरात भवन शास्त्रीनगर येथे मंगळवार दिनांक 29/08/2023 रोजी दुपारी 2ः30 वाजता शास्त्रीनगर व परिसरातील महिलांच्या आरोग्यासंदर्भात केएलई हाॕस्पिटलच्या स्त्रिरोग तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी शास्त्रीनगर व परिसरातील स्त्रियांनी या कार्यक्रमाला हजरी लावावी ही विनंती.

टीप – महिलांसाठी आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरानंतर लवकरच ‘ऑपरेशन मदत’ ग्रूप व सामाजिक संघटनांतर्फे (हिमोग्लोबीन, बीपी-शुगर तपासणी, डोळे विकार, दंतविकार तपासणी, जनरल हेल्थ चेक-अप, हाडाचे विकार, त्वचा विकार, स्त्रिरोग तज्ञांतर्फे तपासणी, बालरोग विषयी तपासणी) मोफत आरोग्य शिबीर भरवले जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *