चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कोडनी गावात चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्याचे लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी उद्घाटन केले. लघु पाटबंधारे आणि अंतर्जल विकास खात्यातर्फे बुदीहाळ गावात वेदगंगा नदीवर आणि चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पूल वजा बंधार्याचे रविवारी लघु पाटबंधारे आणि संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी लोकार्पण केले.
यावेळी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर येथील कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित होते.
बंधार्याचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मंत्री माधुस्वामी म्हणाले, बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पेयजल आणि शेतीला पाणी पुरविण्याला प्राधान्य देत आहे. आज येथे उद्घाटन केलेल्या पूल वजा बंधार्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या दूर होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
त्यानंतर बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, शेंडूर ते कोडनीपर्यंतच्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या होती. त्यामुळे मी या भागाची आमदार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या भागातील पाण्याची समस्या सोडवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांधलेल्या पूल वजा बंधार्याचे आज लोकार्पण केले आहे. यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची लोकांची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. याशिवाय आणखी 12 पूल वजा बंधारे बांधण्यासाठी 50 कोटी रुपये अनुदानाला मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खा. अण्णासाहेब जोल्ले, चिक्कोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा, पाटबंधारे अधिकारी मृत्यूंजय स्वामी, सहकार रत्न चंद्रशेखर कोठीवाले, पप्पू पाटील, एम. पी. पाटील, निपाणी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपाध्यक्षा नीता बागडे यांच्यासह कोडनी गावचे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
Spread the love बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि …