Monday , December 8 2025
Breaking News

पट्टणकुडीत पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Spread the love

 

चिक्कोडी : नजीकच्या पट्टणकुडी (ता. चिक्कोडी) येथे पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) सायंकाळी घडली. सक्षम भरतेश उपाध्ये असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, उपाध्ये कुटुंब यांचे जैन बस्ती परिसरात घर आहे. त्यांच्या घराला लागून त्यांनी आणखीन एका नव्या घराचे बांधकाम सुरू केले आहे. दरम्यान घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीत खेळता खेळता मयत सक्षम हा पडला. दरम्यान बराच उशीर सक्षम कुटुंबीयांच्या नजरेस न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला. मात्र तो मिळून न आल्याने तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

दरम्यान त्याला तातडीने उपचारासाठी गावातील रुग्णालयात हलवले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील त्याला निपाणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका अनिता राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली. मयत सक्षम यांच्या पक्षात आई, वडील, लहान बहिण असा परिवार आहे. सक्षमच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

Spread the love  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *