बेळगाव : ब्रिटिशांच्या विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा या स्वाभिमानाने लढल्या. त्यांच्या स्वाभिमानामुळेच आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येकाने लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने जगले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
अंकली (तालुका चिकोडी) येथे काल मंगळवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळ्याचे अनावरण, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या मद्यार्क निर्मिती व इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन त्याचबरोबर प्रभाकर कोरे क्रेडिट सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी खासदार प्रभाकर कोरे तर पाहुणे म्हणून सहकारमंत्री सोमशेखर, वन व आहार मंत्री उमेश कत्ती, लक्ष्मण सवदी, आम.गणेश हुक्केरी, आमदार दूर्योधन ऐहोळे, महांतेश कवटगीमठ, सांगलीचे खासदार संजय काका पाटील, कृष्णा रेड्डी, जगदीश कवटगीमठ, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवणे, मल्लिकार्जुन कोरे, महांतेश पाटील, उपाध्यक्ष सिद्धगौडा मगदूम, संचालिका प्रीती दोडवाड, सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य अध्यक्ष आर. हरी व्यासपीठावर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta