चिक्कोडी : लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली असून 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 18 उमेदवार रिंगणात आहेत.
राजू सोल्लापुरे आणि इस्माईल मगदुम यांनी पक्षनिहाय उमेदवारी दाखल केली.
भारतीय जनता पक्षाकडून अण्णासाहेब एस.जोल्ले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रियांका जारकीहोळी, जनता पार्टी पक्षाकडून अप्पासाहेब कुरणे, कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाकडून कुमार डोंगरे, बहुजन भारत पक्षाकडून पवनकुमार बाबुराव माळगे, भारतीय जवान किसान पक्षाकडून सत्यप्पा दशरथ काळे, अपक्ष म्हणून कदैय्या शंकरैया, हिरेमठ, काशिनाथ कुराणी, गजानन पुजारी, जितेंद्र सुभासेना सनदी, महेश अशोक, मोहना मोतन्नावर, यासीना शिराजुद्दिना पत्की, विलास मन्नूर, शंभू कल्लोलिकरा, श्रीनिका अण्णासाहेब सरदार, सरदार सरंजामदार हे सर्व निवडणूक रिंगणात असतील असे निवडणूक अधिकारीराहुल शिंदे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta