Sunday , April 20 2025
Breaking News

दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अद्याप जिवंत, ९ वर्षांनी छोटा राजनचा फोटो आला समोर

Spread the love

 

मुंबई : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा करोना काळात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. राजनचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्याचदरम्यान त्याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. मात्र छोटा राजन अद्याप जिवंत असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच राजनचा एक फोटोदेखील व्हायरल होत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियन पोलिसांच्या मदतीने पकडून भारतात आणलं होतं. विमानतळावर त्याला पोलिसांच्या ताब्यात देत असताना राजनचा शेवटचा फोटो समोर आला होता. त्यानंतर थेट करोना काळात राजनचा रुग्णालयात उपचार घेतानाचा एक फोटो समोर आला होता. त्याचदरम्यान राजनचा मृत्यू झाल्याची बातमीदेखील समोर आली होती. मात्र राजन अद्याप जिवंत असून त्याचा नवीन फोटो समोर आला आहे.

छोटा राजन पूर्णपणे ठणठणीत असून तब्बल नऊ वर्षांनी त्याचा फोटो समोर आला आहे. राजन सध्या तिहारमधील दोन नंबरच्या तुरुंगातील एका सुरक्षित बराकीत तुरुंगवास भोगत आहे. तर तिहारच्या तुरुंग क्रमांक दोनमध्येच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. करोना काळात राजनचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो जिवंत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. लॉकडाऊन काळातला राजनचा मास्क परिधान केलेला एक फोटो नुकताच समोर आला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गँग राजनला तुरुंगात ठार करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजनच्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आल्याची चर्चा आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट

Spread the love  कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *