नागरमुन्नोळी : बेळगाव जिल्ह्यातील नागरमुन्नोळीजवळील बेळकोढ गेटजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून राकेश वाटकर (23) आणि सौरभ कुलकर्णी (22, रा. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिक्कोडीचे डीवायएसपी गोपाळ कृष्णगौडा, सीपीआय विश्वनाथ चौगला, पीएसआय रुपाली यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चिक्कोडी रहदारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.