
चिक्कोडी : व्यवसायानिमित्ताने चिक्कोडी येथे आलेल्या कुटुंबियांच्या कारमध्ये सिलिंडर स्फोट झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावातून चिक्कोडी येथे माता – शिशु रुग्णालयासमोर टेन्ट घालण्यासाठी सदर कुटुंब आपल्या वॅगन आर कार मधून आले होते. दरम्यान कारमधील सिलिंडरचा स्फोट होऊन कारमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून ज्ञानसिंग कलासिंग चितौड यांचे कुटुंबीय मात्र सुदैवाने बचावले आहेत. कारमधील सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
Belgaum Varta Belgaum Varta