तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरी येथील
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या माया महादेव पाटील (रा. मांडेदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथे कृषी सप्ताह साजरा झाला.
ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये माती परीक्षण, कलम पद्धत, बागायती पिकांसाठी खड्डे खोदणे आणि भरणे या विषयावर सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी शेतकरी भरमाना पाटील, सविता सुतार, महादेव पाटील, प्रेमा पाटील, ललिता सुतार, तनुजा सुतार, पार्वती पाटील यांना प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
यानंतर गावातील श्री हनुमान विद्यालयासमोर वृक्षारोपण केले. या प्रसंगी प्राचार्य पी. टी. वडर, एम. एम. कांबळे, एस. डी. भोगण, मारुती कोले, भूषण पाटील उपस्थित होते.
माया पाटील यांना नेसरी येथील प्राचार्य एम. डी. माळी, बी. बी. कडपे, योगेश शिंदे, किरण दहातोंडे, सागर वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta