बेंगळुरू : कोरोना संसर्ग दर कमी आहे अशा ठिकाणी लॉकडाउन मागे घेऊन अनलॉक करण्यावर विचार करण्यात येईल. याबाबत सर्व जिल्ह्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात अनलॉकचे संकेत दिले.
बंगळुरात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या कृष्ण या गृहकचेरीत शनिवारी कर्नाटक बांधकाम आणि इतर निर्माण कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात सहायधन थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला चालना देऊन ते बोलत होते. ते म्हणाले, सध्याचा लॉकडाउन येत्या १४ जूनला सकाळी ६ वाजता संपेल. त्याआधी ४-५ दिवस कुठे अनलॉक करण्याची आवश्यकता आहे, कुठे सवलत दिली पाहिजे, यावर सगळे अवलंबून आहे. संसर्ग दर शेकडा ५च्या खाली आला पाहिजे.
बांधकाम कामगारांना प्रत्येकी ३ हजार रुपये प्रमाणे २५ लाख कामगारांना अर्थसाह्य मंजूर केले आहे. त्याचप्रमाणे ४ लोक कामगारांना सांकेतिक पद्धतीने १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये दिले आहेत. या क्षेत्रातील कामगारांना अर्ज करण्यासाठी ऍप आणले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकंदर १४ जुनपूर्वीच लॉकडाउनमध्ये सवलत मिळाल्यास आश्चर्य वाटू नये असेच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसते. मात्र कोरोना संसर्ग दर शेकडा ५ इतका असेल तरच लॉकडाउन होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढे काय होते हे पहावे लागेल.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …