Sunday , October 13 2024
Breaking News

काँग्रेसच्या कोविड -१९ हेल्पलाईनचे अनावरण

Spread the love

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कोविड आपत्तीमध्ये मदत होण्याच्या दृष्टीने, काँग्रेसकडून सुरु करण्यात आलेल्या कोविड-१९ हेल्पलाईनचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अनावरण केले. यावेळी होम करुन जर कोरोना दूर होईल एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता नाही असे सांगणाऱ्या आ. अभय पाटील यांनी ते सिद्ध करावे, काँग्रेसकडून त्यांचा सत्कार करु अशी खिल्ली त्यांनी उडवली.
कोविड परिस्थितीला अनुसरुन जनतेच्या सोयीसाठी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसकडून संपूर्ण राज्यभरात एक हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी रविवारी बेळगावमधील कॉंग्रेस भवनामध्ये फीत कापून कोविड – हेल्पलाईन सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन केले.
यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, कोविड परिस्थितीतील अडचणीना तोंड देण्यासाठी कॉंग्रेसकडून राज्यव्यापी हेल्पलाईन सुरू केली जात आहे. केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या आदेशानंतर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रांमध्ये व्यवस्थित पद्धतशीरपणे काम करण्याची माहिती देण्यात आली आहे. कोविड किट हेल्प लाईनद्वारे वितरित केले जाईल. याव्यतिरिक्त, अनेक ठिकाणी आवश्यक फूड किट आणि औषधे वितरित केली जातील. कॉंग्रेस लोकांच्या अडचणी निवारण करण्याचे काम करीत आहे. दुसऱ्या लाटेत लोकांना लसीकरणासाठी सरकारला ३ कोटी रुपये दिले आहेत. लोकांना अनुकूल होण्यासाठी सहकार्य करीत आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.
एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन वाढवायला हवे. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन हळूहळू कमी करावे. होम करुन कोरोना गेल्यास आम्हाला आनंद होईल. पण त्यांनी ते सिद्ध करावे. कोरोना गेल्यास आमदार अभय पाटील यांचा सत्कार केला जाईल. आम्ही १५ दिवसात सिद्ध करु, फोरमवर चर्चा करू. हे भाजपमध्ये काही नवीन नाही. होम करुन कोरोना जात असेल तर ५ वर्ष मेहनत केल्यानंतरच एमबीबीएस पदवी का मिळते? त्यांनी आपले म्हणणे सिद्ध केल्यास आम्ही आ. अभय पाटील यांचा सत्कार करु अशी खिल्ली उडवली.
माजी आमदार अशोक पट्टण म्हणाले की, होम केल्यानंतर कोरोना कमी व्हायला हवा होता पण उलट जास्त झाला आहे, दिवसेंदिवस कोरोना संक्रमित प्रकरणे वाढत चालली आहेत.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि बेळगाव ग्रामीण जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी : पावसाच्या सरीतच ‘बाप्पां’च्या आगमनाची तयारी

Spread the love  बाजारपेठेत सजावट साहित्यासह, फळे खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : लाडक्या गणपतीबाप्पांच्या आगमनासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *