बेळगाव : “प्रोत्साह फाऊंडेशन” च्यावतीने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून बिम्सचे डाॅ. विलास होनकट्टी यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र सैनिक गंगप्पा होंगल सभा भवन, टिळकवाडी येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना डाॅ. विलास होनकट्टी म्हणाले, कोरोना बधितांची संख्या कमी होत असली तरी कोरोना अद्याप आहेच. यासाठी प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कटाक्षाने करावा तसेच सामाजिक अंतर पाळावे. “प्रोत्साह फाऊंडेशन”चे संतोष होंगल म्हणाले की, डॉक्टरांनी कोरोना सावटात स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली आहे. त्यांच्या कार्यास शतशः वंदन. कार्यक्रमाला प्रमुख सामाजिक कार्यकर्ते वैभव खाडे, हिरालाल चव्हाण, शंकर कांबळे, शिवाजीराव पवार, संजय चौगुले उपस्थित होते.