Tuesday , March 3 2026
Breaking News

माधुरी जाधव यांच्याकडून इस्कॉन मंदिर येथे सॅनिटायझर फवारणी

Spread the love

बेळगाव : कोरोनाच्या काळात गल्लोगल्ली सॅनिटायझर फवारणी करण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने पुढे येत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव या अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असून वाढती मागणी पाहता त्यांनी इस्कॉन मंदिर, टिळकवाडी येथे सॅनिटायझर फवारणी करून मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या कामी त्यांच्या सोबत विनय पाटील, शुभम दळवी यांचे सहकार्य लाभले.

संभाजी नगर वडगाव येथेही फवारणी

दरम्यान, गणेश गल्ली संभाजी नगर वडगाव येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्याकडे आपल्या गल्लीत सॅनिटायझर फवारणीसाठी विनंती केली होती.
तात्काळ माधुरी जाधव यांनी महानगरपालिकेला संपर्क साधून संपूर्ण गल्लीत सॅनिटायझर फवारणी करून घेतली. त्याबद्दल गल्लीतील नागरिकांनी माधुरी जाधव यांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *