नवी दिल्ली : फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे आत्ताच अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी यांनी मिल्खा सिंग यांना दूरध्वनी करीत ते लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली.