Tuesday , March 3 2026
Breaking News

निट्टूर येथील युवक बेपत्ता; पंढरपूर येथे मोबाईल लोकेशन

Spread the love

 

तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड तालुक्यातील निट्टूर (जि. कोल्हापूर) येथील युवक गडहिंग्लज येथून बेपत्ता झाला आहे. गणपती नरसू पाटील (वय ३४) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस स्थानकात मारुती दत्तात्रय पाटील यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
गणपती हा औषध विक्री प्रतिनिधी होता. १९ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लजला कामानिमित्त सकाळी १० वा. गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद असल्याचे आढळले. त्याची उंची ५ फूट ३ इंच आहे. अंगाने सडपातळ असून नाक सरळ आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फूल पँट परिधान केली आहे. तो मराठी भाषा बोलतो. या युवकाविषयी माहिती मिळाल्यास चंदगड (जि. कोल्हापूर) पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीची बैठक संपन्न

Spread the love  गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे होणाऱ्या पहिल्या जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलनाचे उदघाटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *