गडहिंग्लज : बुगटे आलूर पंचक्रोशीतील विद्यार्थी गडहिंग्लज येथे शालेय व कॉलेज चे विद्यार्थी बहुसंख्येने गडहिंग्लज येथे शिक्षणासाठी जात असतात. यासाठी निपाणी वरून गडहिंग्लजसाठी एकच बस दिवसातून फेऱ्या मारत असते. सदर बस निपाणी डेपोची असून सकाळी 10:30 ला गडहिंग्लजला जाणारी बस कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांना अपुरी पडत असून दरवाज्यात लटकून प्रवास करत आहेत.
बस संख्येचे प्रवासी व विद्यार्थी एका बसमधून प्रवास करत आहेत, त्याचप्रमाणे संध्याकाळी गडहिंग्लजकडून येणाऱ्या बसमधून सुध्दा असाच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यासाठी आणखी एक बस सोडण्यात यावी म्हणून निपाणी डेपोमध्ये विनंती केली आहे पण अजूनही त्यावर काही हालचाल झालेली नाही. भविष्यात एखादी दुर्घटना झाल्यावरच डेपोला जाग येईल का? अशी विचारणा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta