गडहिंग्लज : हेब्बाळ-जलद्याळ (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे १९९४ बॅचचे माजी विद्यार्थी गेल्यावर्षी अष्टविनायक यात्रा करून सलग दुसऱ्या वर्षी देखील एकत्र येऊन तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी दैवी शक्तींच्या दर्शनाचा लाभ घेतला. धार्मिक सहलीनिमित्य एवढ्या लांबचा प्रवास करून दर्शन घेतल्यामुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सहलीचे आयोजन अमर यमगेकर, मोहन यमगेकर, आशा करंबळकर आणि जिवलग मित्रांनी केले होते. हेब्बाळ जलद्याळ, मुंबई, पुणे, शट्टीहळी, दड्डी, मोदगे, धोंडगट्टे आणि लिंगनूर येथून या मित्र-मैत्रिणीनी आपल्या रोजच्या व्यापातून एकत्र येत आनंदाने प्रत्येक आठवण डोळ्यात साठवून सहल सुखरूप संपन्न केली.
Belgaum Varta Belgaum Varta