Tuesday , March 3 2026
Breaking News

गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे क्रशर खणीत बुडून आईसह मुलाचा मृत्यू

Spread the love

 

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे क्रशर खणीमध्ये बुडून आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय ३२) व मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.

सुजाता ही सामानगड रोडवर असलेल्या क्रशर खणीत कपडे धुण्यास गेली होती. तर रविवारची सुटी असल्याने तिच्यासोबत मुलगा मल्लिकार्जुन हा देखील सायकल घेऊन गेला होता. सुजाता धुणे धूत असताना मल्लिकार्जुन हा पाण्यात उतरून अंघोळ करत होता. खणीत पुढे पाण्याची पातळीवर खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व यातच तो गटांगळ्या खाऊन बुडू लागला. सुजाता ही त्याला वाचविण्यास धावली. मात्र दहा फुटांहून अधिक खोली असल्याने ते दोघेही बुडाले. दरम्यान ते परत न आल्याने शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार आक्रोश सुरु केला होता.

About Belgaum Varta

Check Also

जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीची बैठक संपन्न

Spread the love  गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे होणाऱ्या पहिल्या जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलनाचे उदघाटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *