Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी

  खानापूर : रानडुकराच्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील चापोली गावचा 70 वर्षीय वृद्ध शेतकरी जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंगाराम धुळू शेळके असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गंगाराम हे गवळीवाड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतात जात होते. काही अंतरावर गेले असतानाच रानडुकराने त्यांच्यावर अचानक …

Read More »

नेपाळमध्ये विमान कोसळलं, 40 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

  काठमांडू : नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. विमान अपघातामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ …

Read More »

नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारी याची कसून चौकशी

  बेळगाव : नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी जयेश पुजारी याची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांचे पथक शनिवारपासून हिंडलगा कारागृहात चौकशी करत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी तपास करण्यासाठी बेळगावातील हिंडलगा कारागृहात नागपूर पोलीस शनिवारी रात्री …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 19 फेब्रुवारी रोजी

    बेळगाव : 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार (ता. 15) रोजी सकाळी 11-00 वाजता झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. प्रारंभी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले …

Read More »

मौजे जटगे (ता. खानापूर) येथे 22 जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा

  खानापूर : मौजे जटगे (ता. खानापूर) येथे रविवार दि. 22/ 01/ 2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वा. उद्देश, शिक्षणाबरोबर अभ्यास, खेळ, योग, व्यायाम, कला सर्व स्पर्धांची आवड व्हावी, मानसिक, शारीरिक, सांघिक, एकाग्रता वाढवणे. जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भव्य ओपन मॅरेथॉन स्पर्धा मोफत प्रवेश विजेता स्पर्धकांना मेडल व …

Read More »

निपाणीत 22 जानेवारीपासून अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धा

  युवा नेते उत्तम पाटील : ४ राज्यातील राष्ट्रीय संघ सहभागी निपाणी (वार्ता) : येथील बालवीर स्पोर्ट्स क्लब आणि बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संयुक्त रविवार (ता.२२) ते विद्यमाने मंगळवार (ता.२४) अखेर ‘अरिहंत चषक’ पुरुष आणि महिला हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील देवचंद महाविद्यालयाच्या मैदानावर रात्रंदिवस प्रकाशझोतात या …

Read More »

बेळगावच्या तुरुंगातून नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल!

  बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात फोन …

Read More »

शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

  महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा पुणे : पुण्यात आज (शनिवार) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला. नांदेडचा शिवराज …

Read More »

मानद डॉक्टरेट हा तर संस्थेचा सन्मान : डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर)

  खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबदल सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलताना म्हणल्या की, “मला मिळालेली मानद डॉक्टरेट हा मराठा मंडळ संस्थेचा सन्मान आहे. मराठा मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 11 जानेवारी ते 13 जानेवारी या तीन दिवसांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला अनुक्रमे डाॅ. नम्रता मिसाळे, प्रा.हर्षदा सुंठणकर, श्री.राजकुमार पाटील सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. शाळेमध्ये दोन वर्षानंतर हे स्नेहसंमेलन संपन्न झाले.शाळा मुलांमध्ये पेरत असलेले विचार मुलांच्या विविध गुणदर्शनातून …

Read More »