बेळगाव : नितीन गडकरी यांना फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी जयेश पुजारी याची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांचे पथक शनिवारपासून हिंडलगा कारागृहात चौकशी करत आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी तपास करण्यासाठी बेळगावातील हिंडलगा कारागृहात नागपूर पोलीस शनिवारी रात्री दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नितीन गडकरी यांना शनिवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. त्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नागपूर पोलीस बेळगावात दाखल झाले आहेत. कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव पोलीस त्यांना तपासात मदत करत आहेत. शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक काळ कारागृहामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली असून रविवारी पुन्हा जेलमध्ये शोध मोहीम राबवून तपास करण्यात येणार आहे.