Sunday , September 20 2026
Breaking News

मानद डॉक्टरेट हा तर संस्थेचा सन्मान : डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर)

Spread the love

 

खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबदल सत्कार आयोजित केला होता.

त्यावेळी त्या बोलताना म्हणल्या की, “मला मिळालेली मानद डॉक्टरेट हा मराठा मंडळ संस्थेचा सन्मान आहे. मराठा मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने कार्य करत आली आहे. तो उद्देश ती तळमळ पाच्यात्य मंडळींना कळाली परिणामी मानद डॉक्टरेट पदवी देवून मला सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माझा नसून संस्थेचा सन्मान आहे. संस्थेत राबणार्‍या प्रत्येक हातांचा हा सन्मान आहे.” असे उद्गार त्यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम. एल. सी. श्री. नागराज यादव उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. परशुरामअण्णा गुरव हे होते. कार्यक्रमाची सुरवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. एम. तिर्लापूर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग, विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

उद्या बी आणि सी एक्झॅम साठीचे ऍडमिट कार्ड फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही उद्या डॉक्युमेंट घेऊन आला नाही तर तुम्हाला फेब्रुवारी मध्ये होणार्‍या एक्झॅमला बसता येणार नाही. शिवाय ज्या कॅडेटची आर्मी एक्झॅम आहे त्याने उद्या येताना हॉल टीकीट घेऊन येणे व सीनियरकडे सबमिट करायचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *