Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

  बेळगाव : बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकारच नव्हते तर हाडाचे शिक्षकही होते. म्हणूनच त्यांनी “दर्पण”च्या माध्यमातून समाजाला शिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पत्रकारितेबरोबरच शिक्षक, सामाजिक सुधारणा, साहित्य, संशोधन आदी क्षेत्रात त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे केलेले कार्य आदर्शवत आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. …

Read More »

तोपिनकट्टी संचालित शांतिनिकेतन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गुरूवारी दि. ५ रोजी शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला सुगर्सचे चेअरमन, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर होते. तर व्यासपीठावर शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »

आ. अनिल बेनके ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

    बेळगाव : बेळगावातील सरदार्स हायस्कूल मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व्हावी, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. शहरातील सरदार्स मैदानावर आज शुक्रवारी अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर …

Read More »

लोंढ्याजवळील वाटरे रेल्वेगेटवरील काम प्रगतीपथावर

  खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते लोंढा पर्यंतच्या रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम प्रगती पथावर करण्यात येत असून लोंढ्याजवळील वाटरे रेल्वेगेटवर सध्या काम पूर्ण त्याकडे गेले आहे. काम पूर्ण होताच लोंढ्याजवळील वाटरे रेल्वेगेटवरची वाहतुक लवकरच सुरळीत होणार आहे, अशी माहिती रेल्वे अभियंते शशिधर यांनी दिली. यावेळी बोलताना रेल्वे …

Read More »

‘उद ग आई’च्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमला!

  लाखो भाविकांच्या सहभागात शाकंभरी पौर्णिमा यात्रा बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांची आराध्य दैवता असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा आज शुक्रवारी साजरी होत आहे. शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर हजर झाले आहेत. आज शुक्रवारी पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, …

Read More »

कोगनोळी परिसरातील विद्युत पुरवठा आज दिवसभर बंद

    कोगनोळी : येथील कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तिवडे, सौंदलगा, भिवशी येथील कोगनोळी सब स्टेशन अंतर्गत सोडण्यात येणारा विद्युत पुरवठा शुक्रवार तारीख सहा रोजी दिवसभर बंद राहणार आहे. याची नोंद ग्रामस्थानी घेण्याची आहे, असे आव्हान हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. कोगनोळी येथील दुधगंगा नदी फाटा सकाळी सहा ते नऊ या …

Read More »

बेळगावातील दीड कोटींच्या गजेंद्रची महाराष्ट्रात चर्चा

  सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापुरात सध्या बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गजेंद्र नाव असलेल्या 5 वर्षांच्या या रेड्याला हरियाणातील मंडळींनी तब्बल दीड कोटीत विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे. सोलापुरात प्रसिद्ध सिद्धेश्वर …

Read More »

विधानसौधमध्ये अनधिकृतपणे पैशांची वाहतूक

  एकाला अटक; शिवकुमारांची चौकशीची मागणी बंगळूर : विधानसौधमध्ये अवैधरित्या पैसे घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत सुमारे दहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. …

Read More »

येळ्ळूर येथील भाविकांसाठी केले सामाजिक कार्यकर्त्यांनी जमिनीचे सपाटीकरण

  बेळगाव : सौंदत्ती श्री यल्लमा देवी यात्रा आटोपून येळ्ळूरला परतणाऱ्या भाविकांचा पडल्या भरणे कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने यल्लाप्पा पाटील व त्यांचे मित्र प्रशांत नंदीहळ्ळी यांनी गावच्या थडे देवस्थान जवळील जमिनीचे स्वखर्चाने सपाटीकरण व स्वच्छता केली आहे. सालाबाद प्रमाणे येळ्ळूर गावचे सर्व भाविक सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थानला …

Read More »

एमईए संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : “चांगला शिक्षक शिकवितो पण उत्कृष्ट गुरु प्रेरणा देतो आणि घडवितो. अशीच उत्कृष्ट गुरुची भूमिका एमईए या इंग्रजी संभाषण कौशल्य शिकविणाऱ्या संस्थेचे संचालक राजशेखर कोळीमठ पार पाडत असून त्यांनी आजतागायत तब्बल पन्नास हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण कौशल्याचे धडे देऊन घडविले आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे लिंगराज महाविद्यालयाच्या इंग्रजी …

Read More »