Sunday , February 9 2025
Breaking News

‘उद ग आई’च्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमला!

Spread the love

 

लाखो भाविकांच्या सहभागात शाकंभरी पौर्णिमा यात्रा

बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांची आराध्य दैवता असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा आज शुक्रवारी साजरी होत आहे. शाकंभरी पौर्णिमा यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर हजर झाले आहेत. आज शुक्रवारी पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक, पूजा चर्चा करण्यात आली, आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे सौंदत्ती डोंगरावर देवीची शाकंभरी पोर्णिमा यात्रा भाविकांना साजरी करता आली नाही. मात्र यावर्षी देवीचे दरवाजे यात्रेदरम्यान खुले असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भावीक यात्रेसाठी डोंगरावर दाखल झाले आहेत. उद ग आई, उदच्या गजराने सौंदत्ती डोंगर दुमदुमून गेला आहे. भंडाऱ्याची मुक्त उधळन केली जात आहे.

भाविकांच्या उदंड उत्साहात सौंदत्ती रेणुका देवीची शाकंभरी यात्रा यंदा मोठा भव्य प्रमाणात साजरी होत आहे.
यावर्षीची यात्रेसाठी प्रमाण होऊन अधिक प्रत्येक गावातून भाविकांसह, खासगी वाहने, परिवहन महामंडळाच्या बसेस, ट्रॅक्टर, बैलगाड्या इतर खासगी वाहने डोंगरावर आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रचंड संख्येने आलेले भाविक पाहता आवश्यक त्या सुविधाही अपुरे पडलेल्या दिसून येत आहेत. देवी दर्शनाला भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभाव परिसरातही पवित्र स्नानासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा- श्री देवीदरबाराला उत्साहात प्रारंभ

Spread the love  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *