Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेलीच्यावतीने उड्डाण पुलाची स्वच्छता

बेळगाव : समाजाचे प्रती आपलेही काही तरी कर्तव्य आहे हे समजून जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेली सर्व कार्यकर्त्यांनी आज उड्डाण पुलाची स्वच्छता केली. आज सकाळी उड्डाण पुलावर जमला कचरा व पुलावर उगवलेले काँग्रेस गवत तसेच अनेक विषारी वनस्पती ज्याचा धोका सकाळी मॉर्निंग वॉकला येणार्‍या नागरिकांना तसेच वाहनधारकांना होत होता. …

Read More »

फौजदार नियुक्ती घोटाळा करणार्‍यांची गय नाही

गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र : निपाणीत पोलीस कार्यालय इमारतींचे उद्घाटन निपाणी (विनायक पाटील) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने हे स्थळ शक्तिशाली बनले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस समाजव्यवस्था सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांच्या कार्यालयासह निवासस्थानाची वानवा होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आपण राज्यभरात कोट्यावधी रुपये मंजूर करून …

Read More »

गोव्यातील कुशावती नदीचा रुद्रावतार, पुरामध्ये बुडाला पारोडा गाव

मडगाव : मुसळधार पावसामुळे केपेच्या कुशावती नदीला पूर येऊन एका आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पारोडा गाव पाण्यात बुडाला आहे. केपे आणि मडगावला जोडणारा गुडी ते पारोडा हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता आणि पारोडा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे सभोवतालच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पारोडातील काही कुटुंबानी …

Read More »

कोगनोळी-हंचिनाळ रस्त्याची झाली दुरावस्था

प्रवासी वर्गातून नाराजी : त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी कोगनोळी : येथील कोगनोळी हंचिनाळ रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरावस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांच्यातून मोठी नाराजी निर्माण झाली आहे. सध्या सुरू झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात …

Read More »

कोगनोळी दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

कोगनोळी : सोमवारी सकाळपासून कोगनोळीसह सीमाभागात संततधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले होते. या पावसामुळे येथील दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागील २४ तासात येथील दूधगंगा नदी पाणी पातळीत ५ फुटांची वाढ झाली आहे. गेले …

Read More »

गाफील राहू नका, नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …

Read More »

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा …

Read More »

गोवावेस सर्कलजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

बेळगाव : बेळगावात शुक्रवारी सकाळी झालेल्या 2 अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला आहे. रस्त्याच्या सफाईच्या कामात गुंतलेल्या महिलेचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अनिता राजेश बन्स ( वय ५६) असे त्या महिलेचे नाव आहे ती आनंदवाडी पिके कॉर्टर्स येथील रहिवासी होती. …

Read More »

भारताचा इंग्लंडवर 50 धावांनी विजय

साउथॅम्टन ; वृत्तसंस्था : हार्दिक पांड्याने केलेल्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा ५० धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने प्रथम शानदार फलंदाजी करत अवघ्या 33 चेंडूत 51 धावा केल्या आणि नंतर चार विकेट्स घेतल्या.199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव …

Read More »

खानापूर -रामनगर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा : खानापूर म. ए. समितीची मागणी

खनापूर : रामनगर ते रुमेवाडी क्रॉस खानापूर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदनाद्वारे खानापूर तहसीलदारांकडे करण्यात आली. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर -रामनगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे …

Read More »