Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

गुजरातची फायनलमध्ये धडक!

राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय कोलकाता : गुजरात आणि राजस्थान यांच्यातील प्लेऑफचा पहिला सामना अर्थात क्वॉलिपायर-१ चांगलाच रोमहर्षक ठरला. अखेरच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरातने आता फायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. तर पराभव झालेल्या राजस्थानला आणखी एक …

Read More »

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका माथेफिरूने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात एका शाळेतील १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेत मृत्‍युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ८ वर्षीय बंदुकधारी माथेफिरूने मंगळवार (दि.२४) रोजी एका शाळेत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाला …

Read More »

जायंट्स सखीतर्फे मळेकरणीदेवी मंदिर परिसरात डस्टबीनचे वितरण

बेळगाव : उचगाव येथील जागृत मळेकरणीदेवीची दर मंगळवारी आणि शुक्रवारी यात्रा भरत असते. या यात्रेदरम्यान हजारो भाविक याठिकाणी भेट देत असतात. यावेळी प्रासादिक भोजन होत असते. पण स्वच्छतेच्या बाबतीत भाविकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी असते, त्याचा व्यवस्थित निचरा होणे गरजेचे असते पण मंदिर परिसर …

Read More »

निपाणीत पहिल्यांदाच महिलांना उद्घाटनाचा मान

निपाणीत ‘नरेंद्र चषक’ फुटबॉल स्पर्धा ; दिवंगत नितीन शिंदे यांची जयंती निपाणी( वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारी शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी धनश्री शिंदे, सुनीता शिंदे, वैशाली शिंदे, शोभा साळोखे यांच्या हस्ते व …

Read More »

पंचायत निवडणुका ; १२ आठवड्यात सीमांकन, ओबीसी आरक्षण पूर्ण करा

कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला १२ आठवड्यांत प्रभागांचे सीमांकन पूर्ण करण्याचे आणि इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश दिले. यानंतर एका आठवड्याच्या आत, राज्य निवडणूक आयोगाला (एसईसी) निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना द्यावी लागेल, असे स्पष्ट करताना न्यायालयाने आदेश दिले की, राज्य सरकारने सदरची …

Read More »

श्री तुळजाभवानी गोंधळी समाजातर्फे रामचंद्र भोसले यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री तुळजाभवानी गोंधळी समाजातर्फे संकेश्वर हाॅटेल संघटनेचे नूतन अध्यक्ष रामचंद्र भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रामचंद्र भोसले म्हणाले, तुळजाभवानी गोंधळी समाजाचा सत्कार आपणाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. संकेश्वरातील हाॅटेल व्यवसायाला चांगली दिशा देण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन दाखविणार आहोत. यावेळी तुळजाभवानी गोंधळी समाजाचे …

Read More »

दहावी परिक्षेत कु. प्रिया बस्तवाडी गुणवत्ता यादीत

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रिया कुमार बस्तवाडी हिने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९७.१२% गुण संपादन करुन गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदविले आहे. कुमारी प्रिया बस्तवाडी हिचे विशेष अभिनंदन स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव श्रीमती एम. के.पाटील, शाळेचे मुख्याध्यापक नविन …

Read More »

संकेश्वरात दिवसाढवळ्या ३.७५ लाख रुपयांची धाडशी चोरी

आदर्शनगर ५ क्राॅस येथे चोरीची घटना; औषध विक्रेते चोरांचे टार्गेट संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर आदर्श नगर ५ क्राॅस येथील प्रतिष्ठित नागरिक, जगदंबा मेडिकल स्टोअर्सचे मालक जयप्रकाश सावंत यांच्या जगदंबा निवासस्थानी सोमवार दि. २३ मे २०२२ रोजी दुपारी १.३० ते ४ वाजता दरम्यान अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून दिवसाढवळ्या ३.७५ …

Read More »

विधवा प्रथा बंदीची आजरा तालुक्यातील किणे येथून सुरुवात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील छ. शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य व किणे (ता. आजरा) येथील रहिवासी कृष्णा गोविंद कातकर यांच्या निधनानंतर कातकर कुटुंबाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. पती निधनानंतरही पत्नी विद्याताई कातकर यांचे मंगळसूत्र, कुंकू, जोडवी काढण्यात आली नाहीत. कातकर कुटुंबियांचा …

Read More »

कावळेवाडीत होणार विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

बेळगाव : कावळेवाडी (ता.बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाच्या प्रा. मनिषा नाडगौडा असतील. महात्मा फोटो पूजन ग्रामस्थ मंडळ चेअरमन जोतिबा मोरे, संत ज्ञानेश्‍वर …

Read More »