Sunday , July 26 2026
Breaking News

कावळेवाडीत होणार विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

Spread the love

बेळगाव : कावळेवाडी (ता.बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाच्या प्रा. मनिषा नाडगौडा असतील. महात्मा फोटो पूजन ग्रामस्थ मंडळ चेअरमन जोतिबा मोरे, संत ज्ञानेश्‍वर फोटो पूजन ग्रामस्थ मंडळ सचिव कल्लाप्पा यळ्ळूरकर करतील.

प्रमुख वक्ते म्हणून वकील सघटनेचे माजी उपाध्यक्ष ॲड. आप्पासाहेब घोरपडे, स्वागताध्यक्ष म्हणून माजी जि. पं. सदस्य व शिक्षण व माजी आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष मोहन मोरे, सीए जी. ए. मेकलके, माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, बेळगुंदी माजी ग्रा. पं. अध्यक्ष शिवाजी बोकडे, मारुती कडोलकर उपस्थित असतील.

यावेळी बिजगर्णी नुतन ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, सदस्य ॲड. नामदेव मोरे, मनीषा सुतार, बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष म्हाळू मजुकर, धाकलू ओऊळकर, सुरज कणबरकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या दिया मोरे ८९.१२ टक्के (बिजगर्णी), प्रतिभा शेळके ९५.५२ टक्के (कर्ले), मीरा मोटणकर ८५.१२ टक्के (कर्ले), सारिका केसरकर ८९.१२ टक्के (राकसकोप), करुणा लोहार ९४.२४ टक्के (बेळगुंदी), अतुल आवडण ९१.२२ टक्के (बेळगुंदी), राजनंदिनी पाटील व सिफा ताशिलदार ९७.४४ टक्के (बेळगुंदी), आरती मोरे ९३.४४ टक्के, सेजल यळ्ळूरकर ८९.७६ टक्के(कावळेवाडी), रविना बसरीमरद ९९.६८ टक्के (टिळकवाडी), योगिता देवरमनी ९२ टक्के (बीएस्सी) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, मुख्याध्यापक बी. एस. देवरमनी, खजिनदार मनोहर मोरे, वैशाली कणबरकर, पी. आर. गावडे, पृथ्वी जाधव आदींनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *