Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राज्यभाषा दिन साजरा

बेळगाव : मच्छे येथील बाल शिवाजी वाचनालयामध्ये मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला, रविवारी सायंकाळी उत्साहाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला वक्ते म्हणून जी. एस. एस. कॉलेजचे प्राध्यापक श्री. भरत ताेपिनकट्टी सर व प्रमुख पाहुणे म्हणून लष्कराचे पॅरा कमांडो श्री. लक्ष्मण खांडेकर व शशी आंबेवाडीकर व अमेरिका येथे वास्तव्याला असणारे …

Read More »

खानापूर युवा समितीकडून शिक्षकांचा सन्मान

बेळगाव : खानापूर तालुक्यातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अशा शिक्षकांचा सत्कार करून युवा समिमीतीने त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन कणकुंबी हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त रविवारी खानापूर तालुक्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिवस साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आज टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 2013 पासून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक श्री. शिवाजी मंडोळकर यांनी कुसुमाग्रजांच्या फोटो पूजन केले तर …

Read More »

झुंजवाड के. एन. शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकरी ठार

खानापूर (प्रतिनिधी) : झुंजवाड के. एन. (ता. खानापूर) गावच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत असताना रविवारी दि. २७ रोजी दुपारी बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, झुंजवाड के. एन. येथील शेतकरी बसप्पा गणपती पाटील (वय ४६) हा रविवारी …

Read More »

नंदगडात गवत गंजीला आग लागुन नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही कारणाने आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. यात शेतकरी वर्गाच्या जनावरांच्यासाठी साठा केलेल्या शेतातील गवत गंज्याना आग लागण्याचे प्रकार दिसुन येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेच सावट पसरले आहे. असाच प्रकार रविवारी दि. २७ रोजी नंदगड (ता.खानापूर) गावच्या एपीएमसीच्या मागील …

Read More »

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत : प्रा. नानासाहेब जामदार

मोहनलाल दोशी विद्यालयात मराठी भाषादिन   निपाणी (वार्ता) : ‘भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती समजून घेणे हा आनंददायी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या शब्दांची व्युत्पत्ती जाणून घ्यावी. भाषेचे व्याकरण शब्दांची जडणघडण याचा सूक्ष्म अभ्यास करावा. जगातील अनेक देशांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम करून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे …

Read More »

वेश्या अड्ड्यावरील छाप्यात तिघांना अटक

निपाणीत हॉटेलवर कारवाई : पाच महिलांची सुटका निपाणी : येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी(ता.२६) रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून आठ जणांवर कारवाई केली. यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे. मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय …

Read More »

हिंडलगा येथे जागतिक मराठी भाषा दिन साजरा

बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे दि. 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन हा जागतिक मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यायाम शाळेच्या सभागृहात संपन्न …

Read More »

रविवारी खानापूरात पोलिओ डोसचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी): तब्बल दोन वर्षानंतर आरोग्य खात्याच्यावतीने खानापूर सरकारी दवाखान्यात ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ रविवार दि. २७ रोजी देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे, डॉ. तसमीन भानू, डॉ. प्रगती विनायक, डॉ. प्रेमा तोंडी, त्याचबरोबर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, …

Read More »

बेळगावातील भुईकोट किल्ल्यावर ऐतिहासिक दुर्ग पूजा गडकिल्ले संवर्धन

बेळगाव : दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्ग पूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी उत्साहात पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे बाविसावे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतीतील इतर नऊ राज्यातील १३१ हून अधिक गड-किल्ल्यांवर तसेच परदेशातील …

Read More »