Monday , April 20 2026
Breaking News

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत : प्रा. नानासाहेब जामदार

Spread the love
मोहनलाल दोशी विद्यालयात मराठी भाषादिन  
निपाणी (वार्ता) : ‘भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती समजून घेणे हा आनंददायी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या शब्दांची व्युत्पत्ती जाणून घ्यावी. भाषेचे व्याकरण शब्दांची जडणघडण याचा सूक्ष्म अभ्यास करावा. जगातील अनेक देशांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम करून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत,
असे मत देवचंद कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जामदार बोलत होते. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे व ग्रंथांचे पूजन मुख्याध्यापिका पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकातून एस. एस. सांडगे यांनी मराठी भाषादिनाचा हेतू सांगितला. डी.बी. बेनाडे यांनी कुसुमाग्रजांचा जीवनप्रवास व वाङ्मयीन कार्य उलगडून दाखवले.
यावेळी चैतन्या पेडणेकर, वैष्णवी माने, देवकी घोळवे, नक्षत्रा डवरी, दीप्ती खाडे, सावरी पवार, वरद मलाबादे, गौरव पारधी, वरद मेस्त्री, प्रांजली जाधव, प्रांजल कोंडेकर, स्वरज्ञा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगतातून मराठी भाषेची थोरवी गायली व  स्वरचित कविता सादर केले. कार्यक्रमास बी. एस. जाधव, शिक्षकप्रतिनिधी आर. डी. पाटील, कर्मचारी प्रतिनिधी बी. डी. यादव यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. एस. एस. सांडगे यांनी सूत्रसंचालन तर व्ही. आर. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *