Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावात कायदामंत्री मधुस्वामी यांच्याविरोधात अभाविपचा रोष

बेळगाव : कायदा आणि संसदीय मंत्री जे. सी. मधुस्वामी यांच्याविरोधात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. बेळगाव सुवर्णविधानसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मधुस्वामी युके 27 या हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी मधुस्वामी यांच्या विरोधार्थ विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचा आग्रह करत अभाविप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सक्षमीकरणासाठी कार्यक्रम आखण्याचा आग्रह

बेळगाव : भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करत आहे, दलित समाजाच्या प्रगतीची भाजपाला काळजी नाही, असे विधान कर्नाटक प्रदेश समिती काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एफ. एच. जक्कप्पनवर यांनी केले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवे काँग्रेसने दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना केली आहे. …

Read More »

येळ्ळूरमध्ये कडकडीत बंद

बेळगाव : सकाळपासून येळ्ळूरमधील सर्व दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये गावातील सर्वांनी सहकार्य केले. काल मेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दिपक दळवी यांच्यावर शाहीफेकचा भ्याड हल्ला झाला त्या कृत्याचा येळ्ळूरवासियांनी जाहीर निषेध केला. यावेळी येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्राम पंचायत …

Read More »

खानापूरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी बेळगांव येथे महामेळाव्याच्या दरम्यान कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करत त्यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. याचे पडसाड सीमाभागात पसरले असून मंगळवारी खानापूर शहरासह तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले. मंगळवारी पहाटेपासून शहरात बंदचे वारे वाहू लागले. सकाळी आठ वाजल्यापासून खानापूर …

Read More »

ग्रामीण भागात बंद 100 टक्के यशस्वी; बेळगुंदीत साखळी उपोषण

बेळगाव : महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासह काळे फासण्याच्या कृत्याच्या विरोधातील बेळगाव बंदच्या आवाहनानुसार आज मंगळवारी बेळगाव तालुक्यातील गावागावांमध्ये उस्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगुंदी येथे तर साखळी उपोषणाद्वारे निषेध नोंदविला गेला. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ल्याची तीव्र पडसाद तालुक्यात …

Read More »

काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी विजयी

दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी बेळगाव : कर्नाटक राज्यात जारकीहोळी बंधूंचा राजकारणावर असलेला प्रभाव आज पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. काँग्रेस पक्षात असताना रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यात आपली सत्ता स्थापन केली होती. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेला रमेश जारकीहोळी किंगमेकर …

Read More »

बेळगाव बंदच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथे पोलिस बंदोबस्त कडक

कोगनोळी : बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या लोकांनी शाही फेक केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या कोगनोळी कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या शिवसेना व अन्य राजकीय लोकांच्यावर कडक लक्ष देण्यासाठी मोठा पोलिस …

Read More »

मराठी भाषिकांच्या बंदला बेळगावसह परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : बेळगावात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनेक गावातील बससेवाही खंडित झाली असून बंदचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हॅक्सिन डेपो येथे सोमवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात …

Read More »

आज होणार विधानपरिषदेचा निकाल जाहीर

बेळगाव (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणूक निकालाची क्षणगणांना सुरू झाल्याने निकालाचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले दिसताहे. बेळगांव जिल्ह्यातून दोघे उमेदवार विधानपरिषद सदस्य म्हणून नव्याने निवडले जाणार आहेत. ही संधी कोणाला मिळणार याविषयी जो-तो आपआपला अंदाज वर्तविताना दिसत आहे. बेळगांव जिल्ह्यत भाजपाचे 13 आमदार त्यात दोघे मंत्री, दोन खासदार, एक राज्यसभा सदस्य …

Read More »

म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक

करवे कार्यकर्त्यांकडून कृत्य; मराठी भाषिकांकडून आज बंदची हाक बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या निषेधार्थ व्हॅक्सिन डेपो मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित महामेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंच दडपशाही करून काढून टाकण्याचा मनपा अधिकारी व पोलिसांच्या प्रयत्नाला तीव्र विरोध करून समितीने त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज सकाळी मंचावरच ठिय्या आंदोलन छेडले. मात्र यावेळी पोलिसांसमक्ष …

Read More »