Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

लग्नसराईच्या हंगामामुळे फुलांच्या मागणीत वाढ

फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली …

Read More »

खानापूरच्या विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या नेहमीच भेडसावित आहे. याकडे खानापूर नगरपंचायतीचे तसेच या भागाच्या नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष होत आहे. विद्यानगरातील रहिवाशाना गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाही. त्यामुळे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात विद्यानगरात रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे सर्वानाच त्रासाचे झाले आहे. विद्यानगरात गटारीची समस्या …

Read More »

स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसायात प्राधान्य द्यावे

राजू पोवार: जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी निपाणी : सरकारने अनेक ठिकाणच्या भुखंडावर परप्रांतीयांना जागा देवून आणि वीज व पाणीपुरवठा सोयीसवलती कमी दर देवून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकान, हार्डवेअर, सॅनिटरी, मोबाईल शॉप, बांधकाम व्यावसायिक, फळे व भाजीपाला, फर्निचर, मिठाई, हॉटेल, कापड उद्योग अशा सर्वच ठिकाणी परप्रांतीयांचे जाळे निर्माण …

Read More »

रावसाहेब पाटील यांच्यामुळे द. भा. जैन सभेचे कार्य तळागळापर्यंत

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील …

Read More »

खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी, विद्यार्थी वर्गाची गैरसोय

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी असल्याने खानापूरहून बेळगावला ये-जा करणार्‍या विद्यार्थी वर्गाचे तसेच नोकरवर्गाचे आतोनात हाल होत आहेत. सकाळच्यावेळी कॉलेज विद्यार्थी बसला लोंबकळत जाताना दिसत आहेत. इतकी बस प्रवाशानी बरलेली असते. अशावेळी विद्यार्थी लोंबकळत जाताना पडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. …

Read More »

कर्नाटकातील चार जिल्ह्यात हायअलर्ट : कोविड स्थितीवर केंद्राचा इशारा

बंगळूर : कर्नाटकच्या आरोग्य विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये प्रचलित कोविड परिस्थितीवर दक्षता वाढवली आहे, कारण केंद्र सरकारने एका पत्राद्वारे या जिल्ह्यांमध्ये वाढत्या प्रकरणांचा इशारा दिला आहे आणि राज्य सरकारला कारवाई सुरू करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, राजेश भूषण यांनी राज्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे …

Read More »

हिवाळी अधिवेशन होणारच, सर्व तयारी पूर्ण : पालकमंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : आगामी 13 डिसेंबरपासून बेळगावात अधिवेशन होणारचं सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने नोटिफिकेशन केलेलं आहे. बेळगावला येणार्‍या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रहाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे अधिवेशनाबाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी सकाळी बेळगावात भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ …

Read More »

महामेळावा यशस्वी करण्याचा तालुका म. ए. समितीचा निर्धार

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजनासंदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आली आहे. दरम्यान या वर्षीही महामेळावा घेण्यात येणार …

Read More »

अधिवेशनच्या पहिल्या दिवशी समितीचा महामेळावा

बेळगाव : कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक सरकारने चालवलेल्या या प्रथेविरोधात दरवर्षीप्रमाणे महामेळावा घेऊन निषेध नोंदवण्याचा निर्णय …

Read More »

महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री! मिळाला पहिला बाधित रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रातही ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. डोंबिवलीमधील रुग्ण बाधित झाला आहे. तो 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीमध्ये आला होता. बाधित रुग्णाचे वय 33 आहे. बाधित तरुणाने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तो 35 जणांच्या संपर्कात आला होता त्या सर्वांची तपासणी पूर्ण झाली आहे. बाधित रुग्ण दक्षिण …

Read More »