Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे

  कै.नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्ताने जायंट्स मेनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न बेळगाव : जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. जायंट्स मेनच्या वतीने कै. नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते. के एल ई हॉस्पिटलच्या रक्तपेढीत झालेल्या शिबिराची सुरुवात राहुल …

Read More »

चिकोडी भागातील नद्यांना पूर, चार पूल पाण्याखाली

  बेळगाव : महाराष्ट्र आणि चिकोडी, निपाणी तालुक्यात गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांवरील चार पूल पाण्याखाली गेले आहेत. या वर्षी पावसाचा जोर चांगला असून, पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात तसेच चिकोडी आणि निपाणी तालुक्यात …

Read More »

वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांना “कृतज्ञता पत्र” देऊन सन्मान

  बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांच्या 15 जून 2025 रोजी वाढदिवसानिमित्त ठाणे येथे कार्यक्रमात सीमाभागात वैद्यकीय सेवेबद्दल वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांना “कृतज्ञता प्रत” देऊन सन्मान करण्यात आला. श्री. मालोजीराव …

Read More »

जायन्ट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे नाना चुडासमा जी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम….

  बेळगाव : जायन्ट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे संस्थापक, स्वर्गीय श्री. नाना चुडासमा जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्थानिक १९ नंबर शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या, केक आणि अल्पोपहार वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात आला आणि नाना चुडासमा यांची आठवण साजरी करण्यात आली. …

Read More »

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी राज्य सरकार दोषी; भाजपची निदर्शने

  बेंगळुरू : आरसीबी विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत राज्य सरकारच्या अपयशाचा निषेध करत भाजपने आज बेंगळुरू शहरातील फ्रीडम पार्क येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आरसीबी संघाच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात काँग्रेस सरकारच्या अपयशाचा निषेध करत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने जोरदार निदर्शने केली. काँग्रेस सरकारने योग्य व्यवस्था …

Read More »

बल्लोगा जवळील मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील बल्लोगा जवळील मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. बल्लोगा येथील श्री बसवान्ना मंदिरापासून थोड्या अंतरावर सदर मृतदेह दिसून आला आहे. नदीत एका ठिकाणी पाणी कमी झाल्याने सदर अनोळखी मृतदेह नदीतील खडीवर एका ठिकाणी थांबून राहिला आहे. याबाबतची माहिती समजताच खानापूर पोलीस घटनास्थळी …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते मोहन कुंभार यांच्याकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला देणगी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी शाळेचे माजी पालक, अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचे संचालक श्री. मोहन नारायण कुंभार यांनी एक लाख दोन हजार रुपयांची भरघोस देणगी दिली. श्री. मोहन कुंभार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांची दोन्ही मुले मराठी विद्यानिकेतन शाळेत शिकलेली आहेत. त्यांचे स्वतःचे वर्कशॉप आहे. मराठी …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये वन महोत्सव व स्वच्छतागृहाचे उद्घाटन

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आज वन महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुलींच्या स्वच्छतागृहाचे ही उद्घाटन करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राम भंडारे व सौ. प्रीती भंडारे यांच्या हस्ते मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन व वन महोत्सव साजरा करण्यात आला. श्री राम भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …

Read More »

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू!

  बेळगाव : महाराष्ट्रातील पुणे जवळील इंद्रायणी नदीचे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेळगाव जिल्ह्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावातील युवक चेतन चावरे (२२) यांचा रविवारी पुण्याजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Read More »

खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थींना विषबाधा!

खानापूर : 20 ते 22 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये घडली आहे. सर्वांना उपचारासाठी खानापूर येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातील विविध भागातील युवक पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. …

Read More »