Sunday , July 26 2026
Breaking News

चिकोडी भागातील नद्यांना पूर, चार पूल पाण्याखाली

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र आणि चिकोडी, निपाणी तालुक्यात गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांवरील चार पूल पाण्याखाली गेले आहेत.
या वर्षी पावसाचा जोर चांगला असून, पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात तसेच चिकोडी आणि निपाणी तालुक्यात गेल्या ४-५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी, कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमधील पाणीपातळी वाढत आहे.

मलिकवाड-दत्तवाड, बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज, भोजवाडी-हुन्नरगी हे चार पूल पाण्याखाली गेले आहेत. पाणीपातळी क्षणोक्षणी वाढत असून, त्यामुळे आणखी काही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तालुका प्रशासनाने नदीकाठी अतिदक्षता बाळगली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *