Sunday , July 26 2026
Breaking News

जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी : जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे

Spread the love

 

कै.नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्ताने जायंट्स मेनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

बेळगाव : जायंट्सचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी व्यक्त केले.
जायंट्स मेनच्या वतीने कै. नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते.
के एल ई हॉस्पिटलच्या रक्तपेढीत झालेल्या शिबिराची सुरुवात राहुल शिंदे व आयपीएस अधिकारी अनुपम जैन यांच्याहस्ते नाना चुडासमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, डॉ माधव प्रभू व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी रक्त हे कोणत्याही प्रकारे उत्पादित केले जाऊ शकत नाही त्यामुळे गरजू रुग्णांना सशक्त रक्तदात्याकडूनच ते मिळवणे गरजचे असते त्यामुळे आम्ही दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन करीत असतो असे सांगितले.
यावेळी जवळपास पंधरा जणांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मदन बामणे, संजय शी पाटील, प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, धनराज जाधव, अशोक हलगेकर, मुकुंद महागावकर, जीवन कदम, काशीनाथ कदम, जोतिबा कदम, संतोष दड्डीकर, विनोद आंबेवाडीकर यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *