Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

ब्लॅकमेल करून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पुजाऱ्याला अटक

  बेंगळुरू : बेंगळुरूमधील बेळंदूर पोलिसांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला अटक केली आहे ज्याने एका महिलेला नग्न करून, व्हिडिओ रेकॉर्ड करून आणि बॅक-मेल करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. केरळमधील एका मंदिरातील पुजाऱ्याने बेंगळुरूमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी या प्रकरणात अरुण नावाच्या पुजाऱ्याला अटक केली. आणखी एक पुजारी …

Read More »

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या मूर्तीला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली

  मालवण : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चबुतऱ्याच्या बाजूची काही माती खचली आहे. सततच्या पावसामुळे नव्याने करण्यात आलेल्या जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे मूर्तीस कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे. नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी …

Read More »

कृष्णा खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले

  विजयपूर (दीपक शिंत्रे) : शेजारच्या महाराष्ट्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तर कर्नाटकची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीवरील आलमट्टी धरण वेळेपूर्वीच अर्धे भरले आहे. धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केपीसीएलमार्फत नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रासह कृष्णा खोऱ्यात पडलेल्या …

Read More »

हरीनामाच्या गजरात वडगावचे वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ…

  बेळगाव : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज रविवारी वडगाव राजवाडा कंपाउंड श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो हरीभक्त पंढरपूर मार्गे आळंदीला वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. आषाढी वारीत आतापर्यंत …

Read More »

बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जीम ओनर्स असो. पदाधिकाऱ्यांचा सत्कार

  बेळगाव : जीमच्या माध्यमातून बेळगाव मधील युवक युवतीना व्यसनापासून दूर ठेवून त्यांची शरीरयष्टी घडवणे व्यायामपटू घडवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज बेळगावत 120 हून अधिक जिम उभारणी केलेली आहे. कोणत्याही संघटनेने व्यायाम पटूना स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडथळा आणू नये असे आम्ही आवाहन करीत आहोत असे उद्गार जिम …

Read More »

सलामवाडीत चैतन्याचा महासोहळा: ओंकार गणेशोत्सव मंडळाचा ‘रणझुंजार क्रीडा महोत्सव’

  बेळगाव : ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी लोकमानसात अढळ ख्याती असलेल्या ओंकार गणेशोत्सव मंडळाने, आगामी गणेशोत्सवाचा उत्साह केवळ द्विगुणितच नव्हे, तर अविस्मरणीय बनवण्यासाठी ‘रणझुंजार क्रीडा महोत्सव २०२५’ ची भव्य आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे. मंडळाचा संकल्प हा महोत्सव केवळ धार्मिक परंपरेचा ठेवा नसून, तो श्रद्धा, प्रेम, गौरव, कला, क्रीडा, आणि …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या सी.बी.एस.ई. दहावीच्या गुणवंत वि‌द्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कून बेळगांव येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर ज्योती सेंट्रल स्कूलचे संस्थापक माजी चेअरमन डॉ. पि.डी. काळे, ज्योती पि.यु. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आणि ज्योती सेंट्रल स्कूलचे एस्.एम्.सी. चेअरमन प्रोफेसर आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर्.एस्. …

Read More »

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न

  खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळावा दिनांक ८ जून २०२५ रोजी, स्व. सुषमा स्वराज बचट गट व प्रशिक्षण केंद्र, वडगांव खु. पुणे या ठिकाणी उस्फुर्तपणे पार पडला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉ. संदीप साळवी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा …

Read More »

एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने संकष्टी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाचे पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न शनिवार दिनांक १४/६/२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गल्लीतील जेष्ठ नागरिकांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन करून महाआरती करण्यात आले. यावेळी सुहासिनी महिलांनी …

Read More »

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ६ जणांचा अंत, अनेक पर्यटक बुडाल्याची भीती

मावळ ( पिंपरी चिंचवड): रविवार सुट्टीचा दिवस, पर्यटकांसाठी घातवार ठरला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळल्याने ६ जणांचा अंत झाला असून वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू …

Read More »