बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कून बेळगांव येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर ज्योती सेंट्रल स्कूलचे संस्थापक माजी चेअरमन डॉ. पि.डी. काळे, ज्योती पि.यु. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आणि ज्योती सेंट्रल स्कूलचे एस्.एम्.सी. चेअरमन प्रोफेसर आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर्.एस्. पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे, शालेय ऍडव्हायझरी डायरेक्टर श्रीमती मायादेवी अगसगेकर तसेच शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर, प्रमुख पाहुणे जी.एस्.एस्. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य एस्. बी. कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या एस्. बी. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पालकांना असा संदेश दिला की, “पालकांनी आपल्या पाल्याची आवडनिवड पाहून, क्षमता पाहून मगच त्यांचे क्षेत्र ठरवावे, विद्यार्थ्यांना ताण येईल असा दबाव आणू नये, त्यांना ज्या क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध करावयाची असेल तिथे त्यांना तेच करू द्यावे.” असे सांगितले. याप्रसंगी दहावीचे सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक उपस्थित होते.