Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी जनार्दन रेड्डी यांना दिलासा

  तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन केला मंजूर बंगळूर : ओबळापुरम बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाकडून आमदार गाली जनार्दन रेड्डी यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने अलीकडेच ठोठावलेल्या सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची या टप्प्यावर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आणि जनार्दन रेड्डी यांना सशर्त …

Read More »

वाल्मिकी कॉर्पोरेशन घोटाळा: काँग्रेस खासदार तुकाराम आणि ४ आमदारांच्या घरांवर ईडीचे छापे

  बंगळूर १: महर्षी वाल्मिकी आदिवासी कल्याण मंडळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ६० अधिकाऱ्यांच्या पथकाने आज बेळ्ळारी जिल्ह्यातील चार काँग्रेस आमदार आणि एका खासदाराच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. आज सकाळी बेळ्ळारीतील पाच आणि बंगळूर शहरातील तीन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. छापेमारीची चौकशी सुरू आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या …

Read More »

खानापूर भागात उद्या १२ जून आणि १४ जून रोजी वीजपुरवठा खंडित

  खानापूर : खानापूर भागात उद्या दि. १२ जून आणि १४ जून रोजी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे 110 केव्ही खानापूर उपकेंद्रातून पुरवठा होणारी वीज खंडित करण्यात येणार आहे. लैला साखर कारखाना, देवलत्ती, बिदरभावी, भंडारगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बोरगाव, निडगल, दोड्डहोसूर, …

Read More »

भीषण अपघातात नवविवाहित वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू

  जयपूर : एका कारला समोरुन येणाऱ्या कंटेनरने धडक मारली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात एका नवविवाहित दांपत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात जयपूर ग्रामीण भागातील जमवारागडजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४८ वर ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

धर्मांतरासाठी ७ महिन्यांच्या गर्भवतीचा छळ; महिलेची आत्महत्या…

  सांगली : सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सांगलीमध्ये एका ७ महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीत कुपवाडा येथील ७ महिन्यांच्या गर्भवती …

Read More »

बेळगावच्या चित्रकाराची चित्रे फ्रान्समधील पुस्तकात…

  बेळगाव : क्रॉसड ग्लान्सीस हे पुस्तक नुकतेच फ्रान्समध्ये प्रकाशित झाले असून त्यामध्ये जगभरातील निवडक दहा चित्रकारांची माहिती आणि चित्रे असून त्यामध्ये बेळगावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विकास पाटणेकर यांचा समावेश आहे. फ्रान्समधील प्रख्यात प्रकाशन संस्था युलेसेसने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. पेट्रा वॉटर्स यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून पुस्तक …

Read More »

सेंट अँथनी चर्च येथे 13 रोजी वार्षिक फेस्तचे आयोजन…

  बेळगाव : फिश मार्केट, कॅम्प, बेळगाव येथील सेंट अँथनी चर्च येथे शुक्रवार दि. 13 जून 2025 रोजी सेंट अँथनी यांचे वार्षिक फेस्त साजरे होत असून भक्तांनी फेस्तमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेंट अँथनी वार्षिक फेस्तप्रसंगी बेळगाव शहराच्या विविध भागातून आणि शहराच्या आसपासच्या गावांमधून हजारो यात्रेकरू …

Read More »

वटपौर्णिमेच्यानिमित्ताने अन्नपूर्णेश्वर नगर येथील सान्सी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम…

  बेळगाव : वटपौर्णिमा अर्थात सुवासिनींनी वडाला पुजण्याचा दिवस. आजच्या दिवशी सावित्रीने स्वतःचा पती सत्यवानाचे प्राण प्रत्यक्ष यमाकडून परत आणले. अशी आख्यायिका आपल्या हिंदू धर्मात सांगितली जाते. तिचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशातील लाखो स्त्रिया आजच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास करतात. वडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, …

Read More »

बेळगावच्या निर्मात्यांनी साकारलेली मनोरंजनाची अफलातून ट्रीट “ऑल इज वेल” 27 जूनला चित्रपटगृहात

  बेळगाव : मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पड‌द्यावर येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला …

Read More »

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी निलंबित पोलिसांच्या निर्णयाविरोधात अभाविपचे आंदोलन

  बेळगाव : बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्या निलंबनाच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले. आज बेळगावातील आर.पी.डी. सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थिनी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे राज्य कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ …

Read More »