खानापूर : खानापूर भागात उद्या दि. १२ जून आणि १४ जून रोजी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे 110 केव्ही खानापूर उपकेंद्रातून पुरवठा होणारी वीज खंडित करण्यात येणार आहे.
लैला साखर कारखाना, देवलत्ती, बिदरभावी, भंडारगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बोरगाव, निडगल, दोड्डहोसूर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, यडोगा, बलोगा, जैनकोप्पा, गांधीनगर, हलकर्णी, न्यायालय परिसर, औद्योगिक वसाहत, बाचोळी, कौंदल, झाडनावगा, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, कारलगा, शिवोली आणि चापगाव गावे आणि उक्त गावातील सिंचन पंप संच आणि 33 के.व्ही. लोंढा आणि खानापूर उपकेंद्रातून पुरवठा होणाऱ्या नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्टेशन, मुंढवाद, कुंभर्डा, तारवड, लोंढा, लोंढा रेल्वे स्टेशन, गुंजी, मोहिशेट, वात्री, भालके बी.के., भालके के.एच., शिंदोली, होन्नाला, सावरगाळी, आंबेवाडी, तिवोली, ढोकेगाळी, खानापूर टाऊन, शिवाजी नगर, रुमेवाडी, ओतोली, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरुवाडी, आंबोली, हरसानवाडी, असोगा, नेरसा, अशोक नगर, मणतुर्गा, शेडेगली आणि हेम्मडगा परिसर १२ जून २०२५ आणि १४ जून २०२५ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठ्यात खंडित करण्यात येणार आहे.