Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण : तिघांना न्यायालयीन कोठडी, दोन रिमांड होममध्ये

  बेळगाव : बेळगावामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दोघांची रिमांड होममध्ये रवानगी केली आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता तीन आरोपींना 15 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांची …

Read More »

सिक्कीमच्या लाचेनमध्ये भूस्खलन; तीन जवान शहीद, 6 जण बेपत्ता

  सिक्कीमच्या लाचेन येथे एका लष्करी छावणीत भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. तर सहा सैनिक बेपत्ता आहेत. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाचेन येथे भूस्खलन झाले आहे. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जवान बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता असलेल्या …

Read More »

संतीबस्तवाड येथे कुराण जाळल्याप्रकरणी सीआयडी पथकाकडून तपास सुरू

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात धर्मग्रंथ जाळल्याच्या प्रकरणी सीआयडी अधिकाऱ्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळल्याचे प्रकरण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे. कालच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती दिली होती. आज डीआयसी …

Read More »

पालकमंत्री जारकीहोळी यांनी केले शरीरसौष्ठवपटू मेत्री, आं. रा. पंच लोहार यांचे अभिनंदन!

  बेळगाव : थायलंड मधील पटाया येथे अलीकडेच पार पडलेल्या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता शरीरसौष्ठवपटू विनोद पुं. मेत्री आणि आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच परीक्षा उत्तीर्ण राजेश गणपती लोहार या उभयतांचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी खास अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांप्रमाणे बेळगाव उत्तरचे …

Read More »

क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला; गंभीर जखमी

  बेळगाव : सोमवारी कणबर्गी येथे एका तरुणावर क्षुल्लक कारणावरून तीन जणांनी चाकूने प्राणघातक हल्ला करून पळून गेल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मंजुनाथ असे आहे. मद्यधुंद अवस्थेत आणि दुचाकी चालवत असल्याबद्दल विचारपूस करण्यात आलेल्या या तरुणावर आज सकाळी तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात चार-पाच ठिकाणी दुखापत …

Read More »

पावसाची उघडीप; मशागतीसाठी चलवेनहट्टी भागातील बळीराजाची धावपळ

  बेळगाव : अलिकडे शेतकरी शेतीच्या कामासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात जरी करत असलातरी पेरणीपूर्व म्हणजे खरीप हंगामाच्या सुरवातीला बैलांच्या साह्याने मशागत करावीच लागते. मान्सून दाखल होण्यापूर्वी म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस शेतकरी वर्ग सर्रास आपले शेताच्या मशागतीत गुंतलेला असतो पण यावर्षी अवकाळी पावसाने जोरदार दणका दिल्याने परिणामी शेतीची अंतिम टप्प्यातील …

Read More »

पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक; मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव

  अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने 204 धावांचे लक्ष्य केवळ 19 षटकांतच पूर्ण करत 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा यंदाचा प्रवास येथेच संपला असून, …

Read More »

सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रणासाठी आंबोली धबधबा संध्याकाळी ५ नंतर बंद

  सिंधुदुर्ग : पावसाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुरक्षिततेची चिंता लक्षात घेत आंबोली ग्रामपंचायतीने सावंतवाडी पोलिसांच्या समन्वयाने पावसाळी पर्यटनाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत. ग्रामपंचायत सभागृहात नुकत्याच झालेल्या पावसाळी पर्यटन बैठकीत घेण्यात आलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दररोज सायंकाळी ५ नंतर आंबोली मुख्य धबधबा पर्यटकांसाठी बंद करणे. …

Read More »

किरकोळ भांडणातून तरुणाची हत्या

  बैलहोंगल : बैलहोंगल जवळच्या सुतगट्टी गावात शुक्रवारी संध्याकाळी किरकोळ कारणावरून एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव व्यंकटेश सुरेश दलवाई (१८) असे आहे, जो सुतगट्टी गावचा आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बसवराज सोमिलिंगप्पा पेंटेड (२०) आणि त्याचा भाऊ राघवेंद्र पेंटेड यांचा समावेश आहे. वेंकटेश आणि …

Read More »

१९८६ च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्यपूर्वक अभिवादन!

  बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील स्मारकात रविवारी सकाळी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. १ जून १९८६ साली सीमाभागात कन्नड सक्ती लागू करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात …

Read More »