Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

संतिबस्तवाड कुराण जाळल्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

    बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील कुराण जाळल्याच्या घटनेची पोलिसानी आधीच स्वतःहून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतिबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. जिल्ह्यात अनेक धार्मिक …

Read More »

हडपलेली 13 एकर शेती शेतकऱ्याला परत!

  डीसींच्या कोर्टात गरीब शेतकर्‍यांना न्याय; अथणी तालुक्यातील मदभावी येथील प्रकरण बेळगाव : तांत्रिक कारणांचा आधार घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करत तब्बल 13 एकर 8 गुंठे शेतजमीन तिघा भावांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. परंतु, सलग दोन वर्षे न्यायालयीन लढा देत जक्करहट्टी (ता. अथणी) येथील बजबळे कुटुंबियाने आपली शेतजमीन परत मिळवली. जिल्हाधिकार्‍यांच्या …

Read More »

खानापूरमध्ये प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा

  खानापूर : खानापूर येथे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानद्वारे उभारण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. मराठी साहित्य, भाषा आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे …

Read More »

आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे उद्या जंगी स्वागत…

  बेळगाव : थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याने सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचे धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर बुधवार ता 14 मे रोजी सकाळी 11.00 जंगी स्वागत करण्यात येणार आहे, विनोदने भारताचे प्रतिनिधित्व करीत …

Read More »

बेळगावात कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी हालचाल

  केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल चिक्कोडी ऐवजी बेळगावात उभारणीसाठीबाबत आज केडीपी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी योग्य जागा शोधण्याकरिता १० दिवसांचा अवधी मागितला आहे. बेळगाव जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज केडीपीची बैठक …

Read More »

बेळगावात मुली, महिला सुरक्षित आहेत काय? : भाजप नेत्या डॉ. सरनोबत यांचा सवाल

  बेळगाव : दोन दिवसांपूर्वी नानावाडी येथे तीन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचा आरोप आहे. यामध्ये दोन मुले पोलिस कोठडीत आहेत, तर एक फरार आहे. बेळगावचे पोलिस खाते आणि प्रशासकीय संस्था काय करत आहेत, असा सवाल कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चाच्या सचिव डॉ. सोनाली …

Read More »

चापगांव परिसरातील शेतवडीत वीज कोसळून 11 बकरी मृत्युमुखी…

  खानापूर : खानापूर तालुक्यात आज सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. याचदरम्यान चापगांव येथील शेतवडीत सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी वीज कोसळल्याने एका धनगराची 11 बकरी मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर धनगराचे नाव उमेश यल्लाप्पा चिचडी, राहणार होण्णनूर तालुका बैलहोंगल असे आहे. चापगांव येथील मानीतील तलाव …

Read More »

खानापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

  खानापूर : खानापूर तालुका परिसरात आज दुपारच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसामुळे, खानपूर-नंदगड रस्त्यावर करंबळ गावाजवळ एक मोठे झाड कोसळले. या घटनेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक एक तासाहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या घटनेच्या वेळी झाडाखाली कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. …

Read More »

विविध मागण्यासाठी स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांचा जिल्हा पंचायतीवर मोर्चा

  बेळगाव : पंचायत व्याप्तींमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सकाळी बेळगाव जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या (सीटू) नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत …

Read More »

फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू

  जोयडा : फणस खाण्यासाठी झाडावर चढलेल्या अस्वलाचा विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चापोली या ठिकाणी घडली आहे. सदर अस्वल 14 ते 15 वर्षाचे असून मादी जातीचे आहे. जोयडा तालुक्यातील चापोली घाटामध्ये रस्त्यावर असलेल्या फणसाच्या झाडावर चढून फणस खात असताना झाडाच्या बाजूने गेलेल्या 11 के व्ही च्या …

Read More »