Monday , September 21 2026
Breaking News

संतिबस्तवाड कुराण जाळल्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील कुराण जाळल्याच्या घटनेची पोलिसानी आधीच स्वतःहून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतिबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. जिल्ह्यात अनेक धार्मिक तेढ निर्माण होत असून कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना न्याय मिळालेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर टीका झाली आहे. ट्रम्प यांनी हस्तक्षेप का केला आणि त्यांना कोणी सूचना दिली याचे सत्य लवकरच समोर येईल याची आपण सर्वांनी वाट पाहावी, असेही जारकीहोळी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *