बेळगाव : हुबळी हानगल येथून मुंबई मार्केटकडे जात असलेले कंटेनर स्लीपर बसला चुकवण्याच्या नादात चालकाने कंटेनर गाडी दुभाजकाच्या बाजूने घेतल्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जर कंटेनर स्लीपर बसला जाऊन आढळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. कंटेनर गाडीच्या चालकाने आपला जीव धोक्यात घालून स्लीपर बसला चुकवल्याने कंटेनर रोडच्या साईडला पलटी झाला. कंटेनरमध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख किमतीचे आंबे होते.