Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड

    खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने 61 किलो वजन गटात तालुक्यात आपले प्रावीण सिद्ध केले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत …

Read More »

सेंट झेवियर्स हायस्कूलला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

  बेळगाव : विजापूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव विभागीय माध्यमिक आंतरशालीय १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने पटकाविले. या स्पर्धेतील उप उपांत्य पूर्व सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने हावेरी जिल्हा संघाचा चुरशीच्या सामन्यात 1-0 असा पराभव केला. बेळगाव संघातर्फे एकमेव …

Read More »

टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड

  खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था म्हणून बेळगावच्या शैक्षणिक वलयात सुपरिचित आहे. “चिन हा देश जगातील उत्तम खेळाडू तयार करणारा देश आहे कारण तिथे मुलांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी खेळाच्या कल चाचण्या केल्या जातात म्हणजेच खेळाचे बाळकडू तेथील विद्यार्थ्यांना अगदी …

Read More »

तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श, जी जी चिटणीस, सेंट झेवियर्स अंतिम फेरीत

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श जी जी चिटणीस, कॅन्टोन्मेंट, संत मीरा सेंट झेवियर्स शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात कॅन्टोन्मेंट स्कूलने गोमटेश शाळेचा …

Read More »

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. प्रतिक्षा प्रकाश कदम (ढोलगरवाडी-चंदगड) हिची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बिजगर्णी येथे तिचा सत्कार करण्यात येणार आहे कु. प्रतिक्षा हिने बी.एससी. पदवी कोल्हापूर स्वामी विवेकानंद महाविद्यालयत पूर्ण केली. तिचं स्वप्न होतं की पोलिस उपनिरीक्षक होण्याचं. त्यासाठी सातत्याने …

Read More »

विश्वकर्मा उद्यान लोकसह‌भागातून आदर्श बनवूया

  नामदेव चौगुले : लोकसह‌भागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हा एकच पर्याय आहे. प्रत्येक सण-समारंभ पर्यावरणपूरक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया. विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचे पवित्र कार्य करूया, असे मत …

Read More »

दुर्दैवी घटना; विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरखाली सापडून गणेश भक्ताचा मृत्यू

  बेळगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकी प्रसंगी ट्रॅक्टरखाली सापडून एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कपिलेश्वर उड्डाणपूलावर आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून गणेश भक्ताचे नांव सदानंद बी. चव्हाण -पाटील (वय 48 रा. पाटील गल्ली, येळ्ळूर -सुळगा बेळगाव) असे दुर्दैवी भक्ताचे नाव आहे. घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार, …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला

  बेळगाव : बेळगावात काल रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बेळगावातील चन्नम्मा सर्कलजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांमध्ये डीजेच्या तालावर नाचताना किरकोळ भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन दर्शन पाटील, सतीश पुजारी व प्रवीण गुंड्यागोळ यांच्यावर चाकू …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची बुद्धिबळ व क्रिकेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी रोहिणी बोकनुरकर व कुमार रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. तसेच सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कुमारी श्रावणी पेडणेकर व कुमार गौरव पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी …

Read More »

मळेकरणी सौहार्द सहकारी संघातर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडू हे प्रामाणिक व शिक्षणात सरासरीत सरस असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत मन लावून अभ्यास व खेळात रममान व्हा आणि मोठे व्हा. असा मौलिक सल्ला प्रा. अरुणा नाईक यांनी दिला. मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. येथील मळेकरणी सौहार्द …

Read More »