Saturday , November 7 2026
Breaking News

दुर्दैवी घटना; विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरखाली सापडून गणेश भक्ताचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकी प्रसंगी ट्रॅक्टरखाली सापडून एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कपिलेश्वर उड्डाणपूलावर आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून गणेश भक्ताचे नांव सदानंद बी. चव्हाण -पाटील (वय 48 रा. पाटील गल्ली, येळ्ळूर -सुळगा बेळगाव) असे दुर्दैवी भक्ताचे नाव आहे.

घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणूक सुरू असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उड्डाण पुलाच्या उतारावर ट्रॉलीमधून बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा एक ट्रॅक्टरचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर वेगाने पुढे गेला. त्यात बेसावध असलेल्या सदानंद याला ट्रॅक्टरची धडक बसली आणि तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडला. ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या सदानंद याला चिंताजनक अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेत अन्य एक कार्यकर्ता जखमी झाल्याचे कळते.

सदर घटना घडताच हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, माजी महापौर विजय मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. सदर अपघाताची पोलिसात नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *