बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी रोहिणी बोकनुरकर व कुमार रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले आहे.
तसेच सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कुमारी श्रावणी पेडणेकर व कुमार गौरव पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या खेळाडूंना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, क्रीडा शिक्षक महेश हागीदळे, दत्ता पाटील, पूजा संताजी व श्रीधर बेंनाळकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.