Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

हिंदू खाटीक जातीचा अनुसूचित जातीत समावेश करावा

  प्रा. राजन चिकोडे यांचे निवेदन; अधिवेशनात ठरावाची मागणी निपाणी (वार्ता) : भारतीय राजघटना अनुरूप २६ जून १९५६ रोजी भारत सरकारने हिंदू खाटीक जातीला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याचा अध्यादेश काढला. त्यानुसार देशातील १५ राज्यानी हिंदू खाटीक जातीला अनुसूचित जातीचा दर्जा देऊन त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात प्रगती करण्याची संधी दिली. …

Read More »

महाराष्ट्रात हद्दीत सीमावासियांचा रास्तारोको

  शिनोळी : कर्नाटकाच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्यात येतो. मात्र गेल्या वर्षांपासून महामेळाव्याला परवानगी नाकारण्याचे षडयंत्र कर्नाटक सरकार करत आहे. या वर्षीही बेळगाव जिल्हा प्रशासनाने शहरात जमावबंदी आदेश जारी करून कायदा व सुव्यवस्थेचे तकलादू कारण देत महामेळाव्याला परवानगी नाकारली. त्यामुळे म. ए. समितीने …

Read More »

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेवर मोर्चा

  राजू पोवार; शेंडूर येथे जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : गतवर्षीच्या ऊसाला प्रति टन १५० रुपये द्यावे. यंदाच्या हंगामात उसाला कारखान्यांनी ३५०० रुपये व सरकारने २ हजार रुपये द्यावे, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे जनजागृती केली जात आहे. निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (ता. ७) विधानसौधला घेराओ घालण्यात …

Read More »

बेळगावात आजपासून हिवाळी अधिवेशन

  बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये सोमवार दि. ४ पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जोरदार खडाजंगी रंगण्याची चिन्हे आहेत. पाच राज्यांतील निकालाचेही पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निकालात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. परिणामी भाजपकडून …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय रहावे

  लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडीत ब्लॉक काँग्रेसची बैठक निपाणी (वार्ता) : येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय रहावे. काँग्रेसच्या योजना यशस्वीरित्या प्रत्येक घरांपर्यंत पोहचाव्यात, याकरीता दक्षता घ्याव्यात. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे निरीक्षण करून नव मतदार नोंदणी, दुरूस्ती आणि मयत मतदारांचे नावे कमी करणे या कार्यात व्यस्त राहून काँग्रेसची ध्येय धोरणे तळागाळांपर्यंत …

Read More »

सर्वांच्या सहकार्यामुळे सहकाररत्न पुरस्कार

  युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत संस्थेतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचा आशीर्वाद व अरिहंत उद्योग समूहाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्यामुळे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यामुळे कर्नाटक सरकारकडून दिला जाणाऱ्या सहकार रत्नपुरस्कार मिळाला. हा पुरस्कार केवळ माझा नसून सर्वांचाच असल्याचे मत सहकाररत्न, युवा नेते उत्तम …

Read More »

ऊसासह सोयाबीन, कापसाला योग्य दर द्या

  रयत संघटनेची मागणी : खांद्यावर नांगर घेऊन विधानसौधपर्यंत पदयात्रा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊस, सोयाबीन, कापसासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत दर द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे यरगट्टी येथून रविवारी (ता.३) खांद्यावर नांगर घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेने विधानसौधला धडक देण्यासाठी रवाना झाले. मात्र पोलिसांनी केवळ दहा …

Read More »

महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने शिनोळी येथे रास्ता रोको

  बेळगाव : कर्नाटक सरकारने दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात एक पत्र ही त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे. याची …

Read More »

येळ्ळूरवासीय महामेळाव्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार!

  बेळगाव : 4 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार हे हिवाळी अधिवेशन दर वर्षी बेळगावमध्ये भरवत आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे. या …

Read More »

खानापूरात पत्रके वाटून महामेळाव्याची जनजागृती

  खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. इसवीसन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …

Read More »