Saturday , November 7 2026
Breaking News

महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने शिनोळी येथे रास्ता रोको

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारने दिनांक 4.12.2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात एक पत्र ही त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिलेले आहे. याची दखल घेऊन आज दिनांक 3-12-2023 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक होऊन या बैठकीमध्ये शिनोळी येथे रास्ता रोको कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी उद्या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता बेळगाव, खानापूर, निपाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे. हुतात्मा स्मारकाला वंदन करून सकाळी 11 वाजता रास्ता रोको कार्यक्रमाला शिनोळी येथे सुरुवात करावयाची आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकार सीमाभागातील जनतेवर जो अन्याय करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचे या सीमाभागातील जनतेकडे आणि सीमाप्रश्न सोडवणुकीकडे होत असलेले दुर्लक्ष यांचाही निषेध यावेळी करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *