Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावात अवतरली!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील लाखो लोकांचे स्वप्न अखेर साकार झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाली आणि मोठ्या संख्येने जमलेल्या बेळगावकरांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्स्प्रेसने देशभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बेळगावलाही ही एक्स्प्रेस यावी अशी अनेकांची इच्छा होती. …

Read More »

निपाणी आगारात दीड तोळे सोन्याची चोरी

  वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे प्रवासी संतप्त निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकामधील महाराष्ट्रात जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर बस मध्ये चढताना महिलेचे दीड तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. यावेळी सदर महिलेने आरडाओरड करूनही दागिने न मिळाल्याने संतप्त महिलेला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. याबाबत …

Read More »

भावसार सांस्कृतिक भवनाचे 24 व 25 नोव्हेंबरला उद्घाटन

  माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची प्रमुख उपस्थिती विजयपुर : भावसार क्षत्रिय समाजाच्या नवीन सांस्कृतिक भवनाचा उद्घाटन सोहळा 24 व 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भावसार समाजाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर राजेश मो देवगिरी यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, विजयपूर शहरातील बीएलडीई अभियांत्रिकी …

Read More »

वर्दीची रिक्षा पलटी तीन विद्यार्थी जखमी

  बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा पलटी झाल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मच्छे येथे घडली आहे. बेळगाव खानापूर रोडवर दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पिरनवाडी येथील इंग्लिश मिडीयम शाळेतून मच्छेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाला …

Read More »

निपाणीत हेल्मेट सक्ती कारवाईचा धडाका

  कागदपत्रांचीही तपासणी; दिवसभर कारवाई निपाणी (वार्ता) : जिल्ह्यात दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत चार दिवसांपूर्वी निपाणी पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यावर थांबून दुचाकी शहरांमध्ये जनजागृती केली होती. मंगळवारपासून (ता.२१) हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस …

Read More »

पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्यावर कारवाई करा

  केंद्रीय गृहमंत्र्यांना हिंदु जनजागृतीचे निवेदन निपाणी (वार्ता) : पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भीषण हल्ला करून १४०० हून अधिक लोकांची निघृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी ‘हमास’ला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि ‘हमास’ तसेच तिला पोसणाऱ्या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ देशभरात …

Read More »

हरगापूर गडाचे नामकरण ‘वल्लभगड’ करण्याची मागणी

  बेळगाव : हरगापूर गडाचे नांव तात्काळ बदलून ‘वल्लभगड’ असे करण्यात यावे, अशी मागणी हुक्केरी तालुक्यातील हरगापूर गडावरील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आज सकाळी मोठ्या संख्येने आलेल्या हरगापूर गडावरील नागरिकांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात …

Read More »

युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने बेळगावात निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुकडोळी गावातील दलित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी काही सवर्ण शेतकरी प्रतिबंध करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी युवा कर्नाटक भीमसेनेच्या वतीने आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कुकडोळी गावातील सर्व्हे नं.16,17,18,19,11 या दलित समाजातील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत, काही सवर्ण जमीनदार त्यांना आपल्या …

Read More »

बेळगावात गुन्ह्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी : गृहमंत्री जी. परमेश्वर

  बेळगाव : आम्ही बेळगावातील गुन्ह्यांची संख्या गांभीर्याने घेतली असून, मागील गुन्ह्यांच्या तुलनेत सध्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. बेळगाव शहरात आज पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात महामार्ग आणि इतर रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, बेळगाव परिसरात जमीन, मालमत्ता वादातून …

Read More »

दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात काँग्रेस सरकार अपयशी : अरविंद लिंबावळी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्यातील काँग्रेस सरकारला साफ अपयश आले आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला दुष्काळी निधी अपुरा असून, आणखी निधी देऊन तातडीने दुष्काळ निवारण कामांना सुरवात करावी अशी मागणी माजी मंत्री भाजप नेते अरविंद लिंबावळी यांनी केली. माजी मंत्री भाजप नेते अरविंद लिंबावळी यांच्या …

Read More »